सानिया-शोएब नव्या `पीच`वर थिरकणार...

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिक आता एका टेलिव्हिजन रिअॅलिटी शोच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. ‘नच बलिए – सीझन ५’मध्ये ही जोडी स्टेजवर एकत्र थिरकताना दिसणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 19, 2012, 07:32 AM IST

www.24taas.com, मुंबई
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिक आता एका टेलिव्हिजन रिअॅलिटी शोच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. ‘नच बलिए – सीझन ५’मध्ये ही जोडी स्टेजवर एकत्र थिरकताना दिसणार आहे.
काहि दिवसांपासून या जोडीच्या नावावर बरीच चर्चा सुरू होती. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. ‘नच बलिए – सीझन ५’मध्ये सानिया-शोएबच्या सहभागाची औपचारिक घोषणा बुधवारी केली जाईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, सानिया आणि शोएब पाहुण्याच्या रुपात फक्त एक किंवा दोन भागांमध्ये सहभागी होणार आहेत. सानिया-शोएबच्या सहभागासंबंधी चॅनलच्या अधिकाऱ्यानं या बातमीवर शिक्कामोर्तब करताना म्हटलंय की ‘मी बिग स्टार एन्टरटेन्मेंट अॅवॉर्ड’मध्ये सानियाची भेट घेतली होती’.
‘नच बलिए – सीझन ५’ हा कार्यक्रम येत्या २९ डिसेंबरपासून होणार आहे. या कार्यक्रमात सानिया-शोएबशिवाय आणखी ११ जोड्या सहभागी होणार आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सिनेमा दिग्दर्शक साजिद खान तसचं नृत्य दिग्दर्शक टेरेन्स लेविस हे या कार्यक्रमात जज म्हणून दिसणार आहेत.