www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आता, प्रेक्षकांना घरबसल्या कोणत्याही ग्रहावर सूर्यास्त आणि सूर्योदय, शहरातला प्रकाश, ताऱ्यांचं जग, कडाडत्या वीजा, वादळ यांचे अद्भूत अशी दृश्यं पाहता येणं शक्य होणार आहे. कारण, छोट्या पडद्यावर लवकरच `लाईव्ह फ्रॉम स्पेस` हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
टीव्हीवर दिसणारा दोन तासांचा हा कार्यक्रम इंटरनॅशनल स्पेस स्टेशनद्वारे घेतलेल्या फोटोंमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे.
शनिवारी पहिल्यांदाच एका टीव्ही चॅनलवर `कॉसमॉस : अ स्पेसटाईम ओडिसी` या कार्यक्रमाचं प्रदर्शन होणार आहे. यामध्ये ब्रह्मांडातील अद्भूत दृश्यं पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.