एकता कपूरच्या ऑफिसवर आयकरच्या धाडी

बालाजी टेलिफिल्मवर आयकर विभागाने धाड टाकलीये. एकता कपूरच्या जूहू येथील घरावर आणि बालाजी टेलिफिल्मच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत.

Updated: Apr 30, 2013, 11:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बालाजी टेलिफिल्मवर आयकर विभागाने धाड टाकलीये. एकता कपूरच्या जूहू येथील घरावर आणि बालाजी टेलिफिल्मच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत. एकता कपूर, तुषार कपूर आणि जितेंद्र यांच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आलेत. जवळपास १०० अधिका-यांच्या तुकडीकडून ही छापेमारी सुरू आहे.
एकता कपूरच्या जुहू येथील घरावर धाड टाकण्यात आली. तसेच बालाजी टेलिफिल्म्स आणि स्टुडिओवर ITची धाड टाकण्यात आली आहे. ही छापेमारी एकाच वेळी सगळीकडे करण्यात आली आहे. मात्र अचानक ही धाड का टाकण्यात आली याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही.

१०० अधिका-यांच्या टीमने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. अभिनेता तुषार कपूर यांचा कार्यालयावरही छापा टाकण्यात आला आहे.