बिग बॉस : सलमान आणि पाच वर्षांपूर्वीची कतरीना एकत्र!

बिग बॉसचा होस्ट सलमान खान आणि या कार्यक्रमातील यंदाच्या सीझनमधील एक स्पर्धक एली अवराम हे या कार्यक्रमाच्या ‘फिनाले’मध्ये एकत्र थिरकताना दिसणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 25, 2013, 09:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बिग बॉसचा होस्ट सलमान खान आणि या कार्यक्रमातील यंदाच्या सीझनमधील एक स्पर्धक एली अवराम हे या कार्यक्रमाच्या ‘फिनाले’मध्ये एकत्र थिरकताना दिसणार आहेत.
‘बिग बॉस सीझन-७’ संपण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरलेत. या कार्यक्रमाचा ‘ग्रँड फिनाले’चा शानदार सोहळा आयोजित करण्यात आलाय. अर्थातच, या कार्यक्रमाची ‘जान’ असलेला सलमान खान या कार्यक्रमात थिरकताना दिसेल. यावेळी स्विडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवराम हिच्यासह सलमान थिरकताना दिसेल. ही जोडी सलमान खान आणि कतरीना कैफ अभिनीत सिनेमा ‘एक था टायगर’च्या ‘माशल्लाह’ या गाण्यावर एकत्र डान्स करताना दिसणार आहेत.
‘मिकी वायरस’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अली अवराम ही सलमानच्या आवडत्या लोकांपैकी एक असल्याचं या कार्यक्रमादरम्यान अनेकदा दिसून आलंय. सलमाननं एलीचा उल्लेख अनेकदा ‘पाच वर्षांपूर्वीची कतरीना’ असं म्हणत केलाय.
सलमान आणि एली ही जोडी काही पहिल्यांदाच एकत्र थिरकताना दिसणार नाही... हे दोघे २३ डिसेंबर रोजी एली या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर ‘साथिया ये तूने क्या किया’ या गाण्यावरदेखील एकत्र डान्स करताना दिसले होते.
समारोप सोहळ्यात कार्यक्रम सादर करणाऱ्या इतर स्पर्धकांमध्ये अरमान कोहली, प्रत्यूषा बॅनर्जी आणि काम्या पंजाबी हेदेखील सहभागी होणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.