अभिनेत्री तनुजाला पाहून घाबरली होती- गौहर खान

अभिनेत्री गौहर खान जी यावेळी ‘बिग बॉस-७’ची विजेती ठरली. स्पर्धेत जिंकल्यानंतर गौहर म्हणाली, “मला अजिबात वाटत नव्हतं की मी जिंकेल आणि तनिषाच जिंकेल असं वाटलं होतं. अंतिम स्पर्धेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना समोर पाहून तर मला हे नक्की वाटलं की आता आपण जिंकत नाही.”

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 29, 2013, 10:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री गौहर खान जी यावेळी ‘बिग बॉस-७’ची विजेती ठरली. स्पर्धेत जिंकल्यानंतर गौहर म्हणाली, “मला अजिबात वाटत नव्हतं की मी जिंकेल आणि तनिषाच जिंकेल असं वाटलं होतं. अंतिम स्पर्धेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना समोर पाहून तर मला हे नक्की वाटलं की आता आपण जिंकत नाही.”
जेव्हा आम्ही चौघं संग्राम सिंग, एजाज खान, तनिषा मुखर्जी आणि मी बिग बॉसच्या घरात होतो. तेव्हा मला पूर्ण खात्री होती मीच जिंकणार. मला शो जिंकायचा होता, पण याची अपेक्षा नव्हती, असंही गौहर म्हणाली.
गौहर पुढं म्हणते, “जेव्हा मी आणि तनिषा दोघीच उरलो. तेव्हा माझी जिंकण्याची आशा मावळली. कारण शोसाठी तनुजाजी आल्या होत्या. एवढ्या मोठ्या अभिनेत्री शोसाठी आल्या असतांना मला वाटलं माझ्या हातून ही ट्रॉफी गेलीच.”
गौहरनं सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. या शोमध्ये गौहर खान ५० लाख रुपयांची रोख रक्कम जिंकली आणि ट्रॉफी.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.