www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
टीम इंडियाच्या सामीने शेवटची विकेट काढली आणि वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश मिळाला. भारताने कसोटी मालिका जिंकली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी १ डाव आणि १२६ धावांनी जिंकत ही मालिका २-० अशी जिंकत सचिनला विजयी निरोप दिला. मालिका जिंकल्याचा उत्साह दिसून आला नाही तर सचिनच्या निरोपासाठी भावून झालेल्या प्रेक्षकांचा दिसला.
तिसऱ्या दिवशी पहिली विकेट ख्रिस गेलची विकेट पडली त्याचवेळी वेस्ट इंडिजचा पराभव दिसून आला. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी कमाल करीत विंडिजला धक्क्यावर धक्के दिले. शेवटची विकेट सामीने काढली आणि डावाने विजय साकारला. भारताच्या ३११ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव १८७ धावांत आटोपला. गेल (३५), पॉवेल (९), बेस्ट (९), ब्राव्हो (११), रामदीन (नाबाद ५३) सॅम्युअल्स (११), देवनारायण (०) चंद्रपॉल (४१), सामी (१), शिलिंगफोर्ड (८)), गॅब्रिएल (०) अशी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची अवस्था झाली. भारतातर्फे ओझाने ५, अश्विनने ४ तर शमीने १ बळी टिपला.
मास्टर सचिनच्या डोळयातही पॅव्हेलियनकडे परतताना अश्रू आले. डोळे फुसत सचिन मैदानावरून माघारी फिरला. दुस-या डावात वेस्ट इंडिजकडून दिनेश रामदीनच्या अर्धशतकाचा अपवाद वगळता कोणालाही खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. प्रग्यान ओझा आणि रवीचंद्रन अश्विनच्या फिरकी गोलंदाजी समोर पाहुण्यांनी सपशेल शरणागती पत्करली. प्रग्यान ओझाने पाच तर, अश्विनने चार फलंदाजांना बाद केले. मोहोम्मद सामीने एक गडी बाद केला.
दुसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी गर्दी केली. याचेही कारण निरोपाची कसोटी खेळणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. शनिवारी मोठया प्रमाणात प्रेक्षक वळतील, असे वाटले नव्हते. मात्र तिसऱ्या दिवशीही क्रिकेट चाहते सकाळपासूनच उपस्थित होते. त्याचवेळी ‘सचिन, सचिन चा जयघोष कायम राहिला. शनिवारी पहिल्या तासात पाहुण्यांच्या आणखी तीन विकेट पडल्या. मात्र प्रेक्षक जागचे हललेले नाहीत. सचिन पुन्हा एकदा फलंदाजीला येईल, अशी प्रत्येकाला आशा होती. वेस्ट इंडिजचा टीम गडगडली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.