क्रिकेटच्या देवाच्या नावावर काळाबाजार, तिघांना अटक

वानखेडेवर होणाऱ्या सचिनच्या शेवटच्या मॅचसाठी तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. याचसंदर्भात धक्कादायक बाब उघड झालीय. गरवारे क्लबच्या झनक गांधी, बॉम्बे जिमखान्याचे गिरीश प्रेमना आणि इस्लाम जिमखान्याच्या अजय जाधव यांना तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 13, 2013, 11:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वानखेडेवर होणाऱ्या सचिनच्या शेवटच्या मॅचसाठी तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. याचसंदर्भात धक्कादायक बाब उघड झालीय. गरवारे क्लबच्या झनक गांधी, बॉम्बे जिमखान्याचे गिरीश प्रेमना आणि इस्लाम जिमखान्याच्या अजय जाधव यांना तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.
हे तिघंही त्यांना देण्यात आलेले कॉम्प्लिमेंटरी पास पंचवीस हजारांना विकत होते. तसंच एक हजार रुपयांचं तिकीट आठ हजारांना विकत होते.

सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या टेस्टच्या तिकीटाचा काळाबाजारही जोरात सुरु आहे. यापैकी काही तिकीट दलालांनी हस्तगत केलीत. झी मीडियाच्या कॅमेऱ्यात हा सारा काळाबाजार कैद झालाय़
५०० रुपयांची तिकीटं १० ते १२ हजाराला, एका दिवसाचं तिकीट ५ हजाराला, १ हजाराचं तिकीट १५ हजाराला... हे तिकीटविक्री करणारे एजंट कोण आहेत पाहा...
एजंट नंबर १
सभ्य दिसणारा हा गृहस्थ, चांगला सुशिक्षीत व्यवसायिक आहे. याच्याकडं सध्या १ हजार रुपयाची ३ तिकीटं शिल्लक आहेत. या तिकीटाचा काळ्याबाजारात दर आहे, १० हजार रुपये. म्हणजेच प्रत्येक तिकीटामागे १० टक्के फायदा
एजंट नंबर २
तिकीटांचा काळाबाजार विकणारा हा दुसरा एजंट मात्र गरवारे स्टॅँडचं १ हजार रुपयाचं तिकीट १२ हजाराला विकण्याचा प्रयत्न हा करतोय.
एजंट नंबर ३
वानखेडे स्टेडियमच्या आत असलेल्या गरवारे क्लबचा हा सुरक्षा रक्षक आहे. सध्या सुरु असलेल्या काळ्याबाजाराची सखोल माहिती याच्याकडे आहे. एकाही तिकीटाचे दर ५ हजार रुपयापेक्षा कमी नाही, असा दावा सुरक्षा रक्षक करतोय.
एजंट नंबर ४
हा आहे, एमसीएचा कर्मचारी, याच्याकडं एक कॉम्पलेमेंटरी तिकीट आहे. या तिकीटाची किंमत आहे ५ हजार रुपये हे तिकीटंही तो मोठ्या किंमतीत विकण्याचा प्रयत्न करतोय
एजंट नंबर ५
निळा टी शर्ट घातलेल्या या व्यक्तीचं नाव आहे एलेक्स. मॅनेटमेंटचा सदस्य असल्याचा दावा एलेक्स करतोय. एजंट नंबर १ ची ओळख असल्याचा दावाही तो करतोय. काळ्याबाजारात तिकीटाची डिल कशी होते याची माहिती त्यानं झी मीडियाच्या रिपोर्टरला दिलीय.
क्रिकेटच्या देवाच्या नावावर सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचा हा ढळढळीत पुरावा झी मीडियानं जगासमोर मांडलाय. या दलालांना अटक करण्यासाठी प्रशासन कधी खंबीर पावलं उचलणार हा प्रश्न आता निर्माण झालाय.
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटच्या देवाच्या नावावर काळाबाजार, तिघांना अटक
वानखेडेवर होणाऱ्या सचिनच्या शेवटच्या मॅचसाठी तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. याचसंदर्भात धक्कादायक बाब उघड झालीय. गरवारे क्लबच्या झनक गांधी, बॉम्बे जिमखान्याचे गिरीश प्रेमना आणि इस्लाम जिमखान्याच्या अजय जाधव यांना तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.
हे तिघंही त्यांना देण्यात आलेले कॉम्प्लिमेंटरी पास पंचवीस हजारांना विकत होते. तसंच एक हजार रुपयांचं तिकीट आठ हजारांना विकत होते.

सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या टेस्टच्या तिकीटाचा काळाबाजारही जोरात सुरु आहे. यापैकी काही तिकीट दलालांनी हस्तगत केलीत. झी मीडियाच्या कॅमेऱ्यात हा सारा काळाबाजार कैद झालाय़
५०० रुपयांची तिकीटं १० ते १२ हजाराला, एका दिवसाचं तिकीट ५ हजाराला, १ हजाराचं तिकीट १५ हजाराला... हे तिकीटविक्री करणारे एजंट कोण आहेत पाहा...
> एजंट नंबर १
सभ्य दिसणारा हा गृहस्थ, चांगला सुशिक्षीत व्यवसायिक आहे. याच्याकडं सध्या १ हजार रुपयाची ३ तिकीटं शिल्लक आहेत. या तिकीटाचा काळ्याबाजारात दर आहे, १० हजार रुपये. म्हणजेच प्रत्येक तिकीटामागे १० टक्के फायदा
> एजंट नंबर २
तिकीटांचा काळाबाजार विकणारा हा दुसरा एजंट मात्र गरवारे स्टॅँडचं १ हजार रुपयाचं तिकीट १२ हजाराला विकण्याचा प्रयत्न हा करतोय.
> एजंट नंबर ३
वानखेडे स्टेडियमच्या आत असलेल्या गरवारे क्लबचा हा सुरक्षा रक्षक आहे. सध्या सुरु असलेल्या काळ्याबाजाराची सखोल माहिती याच्याकडे आहे. एकाही तिकीटाचे दर ५ हजार रुपयापेक्षा कमी नाही, असा दावा सुरक्षा रक्षक करतोय.
> एजंट नंबर ४
हा आहे, एमसीएचा कर्मचारी, याच्याकडं एक कॉम्पलेमेंटरी तिकीट आहे. या तिकीटाची किंमत आहे ५ हजार रुपये हे तिकीटंही तो मोठ्या किंमतीत विकण्याचा प्रयत्न करतोय
> एजंट नंबर ५
निळा टी शर्ट घातलेल्या या व्यक्तीचं नाव आहे एलेक्स. मॅनेटमेंटचा सदस्य असल्याचा दावा एलेक्स करतोय. एजंट नंबर १ ची ओळख असल्याचा दावाही तो करतोय. काळ्याबाजारात