`वडेरा-डीएलएफ` चौकशी होणार नाही - चिदंबरम

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा आणि रिअल्टी क्षेत्रातील प्रमुख कंपनी डीएलएफ यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार नसल्याचं अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 9, 2012, 04:08 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा आणि रिअल्टी क्षेत्रातील प्रमुख कंपनी डीएलएफ यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार नसल्याचं अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलंय.
वडेरा यांच्यावर केले गेलेल्या आरोपांसंबंधी स्पष्ट पुरावे समोर येईपर्यंत सरकार या व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्याचं कारण यावेळी पी. चिदंबरम यांनी दिलंय. ‘जेव्हापर्यंत काही मिळवण्यासाठी काही देण्याचे अथवा भ्रष्टाचाराचे विशिष्ट आरोप समोर येणार नाहीत तेव्हापर्यंत कुणाच्या खाजगी व्यवहारांची चौकशी होऊ शकत नाही, फक्त एखादा आरोप केला गेला किंवा इशारा केला गेला त्यामुळे चौकशी होऊ शकत नाही’ असं पी. चिदंबरम यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलंय.
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी केलीय. यावर चिदंबरम म्हणतात, ‘माझ्या मते ज्यांना आरोप करायचेत त्यांनी ते केलेत संबंधित कंपनीनं आणि व्यक्तीनं आपलं म्हणणंही मांडलंय. हे आर्थिक व्यवहारांची कायदेशीर नोंदही स्पष्टपणे केली गेलेली आहे.’