माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही के सिंह भाजपात

माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. ते राजस्थानातील झुंजर येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 1, 2014, 07:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. ते राजस्थानातील झुंजर येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
माझ्या देशाला वाचवण्यासाठी मी हे पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादी आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या पक्षात सहभागी होण्याचा मी निर्णय घेतलाय असं ते यावेळी म्हणाले.
लष्करप्रमुख असताना व्हीके सिंह आणि केंद्र सरकारमध्ये निवृत्तीवेळी वयावरून वाद झाले होते.
आज दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यांनी गेल्या आठवड्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली होती. त्याच वेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
व्ही. के. सिंग यांच्यापाठोपाठ लष्करातील अनेक निवृत्त अधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.. दरम्यान यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी वारंवार घडणा-या नौदलातील अपघातांवून UPA सरकावर चांगलंच तोंडसूख घेतलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.