नक्कल करायलाही अक्कल लागते - राज

पहा राज ठाकरेंनी कोणावर केली टीका, काय म्हणाले राज ठाकरेंच्या भाषणातील हे खास मुद्दे

Updated: Feb 15, 2013, 08:49 PM IST

www.24taas.com, खेड

पहा राज ठाकरेंनी कोणावर केली टीका, काय म्हणाले राज ठाकरेंच्या भाषणातील हे खास मुद्दे -
नक्कल करायला, अक्कल लागते – राज
राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला
नारायण राणेंवरही केला राज ठाकरेंनी प्रहार
मला येऊन कोणत्याही जमिनी घ्यायच्या नाही, रिसॉर्ट घ्यायचे नाहीत, हॉटेलं बाधांयची नाहीत, तरीसुद्धा सांगतोय जमिनी विकू नका - राज
उद्या कोकणातही हीच गोष्ट होईल, तुमच्याच गोष्टी पाहण्यासाठी तुम्हांला पैसा मोजवा लागेल - राज
उद्या तुम्हांला ह्या अशा जागेंवर जाणंही बंद होईल - राज
आपल्या इथल्या लोकांनी, लवासा वैगरे सारख्या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत - राज
आजचं जागे व्हा, नाहीतर आता तुमचं काहीही खरं नाही - राज
मी काय इथे आज तुम्हांला भडकवायला आलेलो नाही, मतंही मागायला आलो नाही - राज
उद्या तुम्हांला जर का महिन्याची शेवटी, खोट्या नोटा हातात पडल्या तर खाल काय? - राज
बांग्लादेशी लोक तेथून येताना, खोट्या नोटा आणतात, आणि आपल्याकडे चलनात आणतात - राज
तुमच्या जमिनी विकू नका, उद्योग करायचा असल्यास तुम्ही त्यात भागीदार व्हा - राज
तुम्हांला काय मिळणार, काही नाही तुम्हांला गृहीत धरलं गेलं आहे - राज
आमच्या मुंबईतील झोपड्यात हे परप्रांतिय राहतात, आणि त्या झोपड्यांची किंमत त्यांना १ कोटी मिळते... - राज
आमच्या आया-बहिणींवर हात टाकतात, हेच ते परप्रांतिय - राज
ह्या कोकणात ते घुसले आहेत, आणि आता तेही पोखरून काढतील - राज
आमची मुंबई, पुणे सगळं त्या लोकांनी पोखरून टाकलं आहे - राज
अरे यांना शिक्षा कसली सुनावतात, त्यांच्या ढुंगणावर लाथा मारून त्यांना हाकलून लावा - राज
काही बांग्लादेशींना अटक केली होती, त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती - राज
हे सगळे अजित पवारांच्या आवडत्या कंपनीचे काम सुरू आहे - राज
त्यांचा परिणाम हा रायगडाच्या किल्ल्यावर होतोय - राज
रायगडाजवळ एका धरणाच्या कामासाठी सुरूंग लावले जातायेत,
ह्या लॉब्या आहेत फक्त, आणि त्यात तुम्ही भरडले जाणार आहे - राज
दाभोळ प्रकल्प समुद्रात बुडवू असं मुंडें म्हणाले होते, मग अचानक कसा तरंगला त्यांचा हा प्रकल्प - राज

पण प्रकल्प चांगला असेल तर विरोध करू नका, राजकारण केलं जातयं याचं - राज
तो जैतापूर प्रकल्प चांगला नसेल तर फेकून द्या - राज
तो कृपाशंकर किती जमिनी घेतो ह्या कोकणात - राज
कंपन्या उभ्या करतात पण त्यात तुम्हांलाही नोकऱ्या देत नाही - राज
आमच्या ह्या कोकणात येऊन परप्रांतिय येऊन तुमच्या जमिनी घेतात,
कोकणातील लोकांना हे लोक नागवं करून सोडणार - राज
कोकणातील लोकांवर राजकीय दहशत - राज
आणि जर ही कारस्थानं नसतील तर मात्र त्यांचा राणेंनी खुलासा करावा - राज
हे काम सगळं नारायण राणेंचं आहे - राज
कोकणातील घरे बळकवता, जमिनी बळजबरीने घेतात - राज
आधी जमिनी घेतात, आणि नंतर रस्ते बनवतात - राज
राज ठाकरेंची नारायण राणेंवर टीका
माझ्या हातात राज्याची सत्ता द्या, मग दाखवतो राज्य कसे हाकायचं असतं... - राज
कधीही हसतानाचा त्यांचा फोटो पाहिला नाही - राज
चेहरा गंभीर असणं साहजिकच आहे... सतत मोजत असतात रात्र दिवस फक्त मोजायचं काम करतात अजित पवार
सतत पाहावं तेव्हा अजित पवारांचा चेहरा गंभीर - राज
अजित पवार नक्कल करण्यासाठी देखील अक्कल लागते - राज
अजित पवार म्हणाले नकला करतो - राज
टीकेसाठी अनेक विषय आहे, पण आज मी कोकणच्या बाहेर जाणार नाही - राज
रात्री अडीच तीनला अटक केली, लपूनछपून कशाला... मीडियाने संपूर्णवेळ लाईव्ह दाखवलं होतं - राज
मला अटक देखील याच जिल्ह्यातून झाली - राज
पक्ष स्थापन केल्यानंतर पहिली विजयाची बातमी याच खेड जिल्ह्यातून मिळाली - राज
कोकणात खास खेडमध्येच सभा घेतली
दौऱ्याची सुरवात महालक्ष्मी मातेच्या दर्शनाने सुरवात केली
राज ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी...
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत परशुराम उपरकर यांचा मनसेत प्रवेश