राज ठाकरे बोलबच्चन, राणे-राज संघर्षाची ठिणगी....

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खेडमध्ये टीका केल्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी राजविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे.

Updated: Feb 19, 2013, 12:56 PM IST

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संधर्ष सुरु झाला आहे. हा संघर्ष राज ठाकरे विरुद्ध नारायण राणे असा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खेडमध्ये टीका केल्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी राजविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे. दादर शिवाजीपार्क भागात राजविरोधी पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
शिवसेनेत असल्यापासून मैत्रीपूर्ण संबंध असलेले राज आणि राणे यांनी एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. खेडच्या जाहीर सभेत बोलताना राणेंवर सिंधुदुर्गच्या जमीन व्यवहारांच्या प्रकरणात टीका आणि आरोप केले होते. राणेंनीही या आरोपांचे खंडन करीत प्रत्यत्तुर दिलं आणि हा वाद शमेल अशी चिन्ह असतानाच राणेपुत्र नितेश यांनी या वादात उडी घेतली.

राज यांची बोलबच्चन अशी खिल्ली उडवणारी पोस्टर्स नितेश यांनी त्यांच्या स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून लावली आहेत. दादरच्या शिवाजी पार्क भागात ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. मनसेच्या नजरेत ही पोस्टर्स आल्यानंतर त्यांनी ही पोस्टर्स उतरविण्या सुरवात केली. दरम्यान, मनसेकडून याबाबत सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.