राज ठाकरेंना भुजबळांचं प्रत्यूत्तर...

‘माझे अनेक हितशत्रू आहेत. माझं नाव घ्यायला त्यांना आवडतं... आता त्याला मी तरी काय करू?’ असा सवाल करत छगन भुजबळ यांना राज ठाकरेंच्या प्रश्नाला उडवून लावलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 8, 2013, 04:43 PM IST

www.24taas.com, मुंबई
‘माझे अनेक हितशत्रू आहेत. माझं नाव घ्यायला त्यांना आवडतं... आता त्याला मी तरी काय करू?’ असा सवाल करत छगन भुजबळ यांना राज ठाकरेंच्या प्रश्नाला उडवून लावलंय. ‘एका पीडब्लूडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तर पीडब्लूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल?’ असा सवाल मंगळवारी राज ठाकरे यांनी विचारला होता. याच प्रश्नाला भुजबळांनी आपल्या शैलीत प्रत्यूत्तर दिलंय.
‘सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ५०० कार्यकारी अभियंते आहेत. त्यांनी केलेल्या लाचखोरीला मी कसा काय जबाबदार ठरतो? प्रत्येक वेळेस त्यांच्या कृत्याचा सवाल माझ्याशी का जोडला जातो?’ कसा सवाल भुजबळांनी विचारलाय. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी ‘चौथा स्तंभ’ या पत्रकार पुरस्काराचे वितरण भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांना पीडब्ल्यूडी खात्यातील लाचखोर अभियंता चिखलीकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी भुजबळांनी चिखलीकरला ओळखण्यासही नकार दिला. ‘मी त्यामुळे कोणत्याही चिखलीकरला ओळखत नाही आणि चिखलीकरचा तपास करताना पोलिसांना जर डायरीच सापडलेली नसेल तर त्यात माझं नावं येईलच कसं? डायरी आणि त्यातील माझे नाव, म्हणजे माध्यमांची बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे’ असं भुजबळांनी म्हटलंय.
‘भ्रष्टाचार तर सर्वच विभागात आहे. मात्र बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा गवगवा अधिक केला जातो. चिखलीकर प्रकरणाची चौकशी एसीबी, ईडी करत आहे. त्यामुळे सत्य लवकरच बाहेर येईल’ असं म्हणत या प्रकरणाचा आणि आपला काहीही संबंध नसल्याचं भुजबळांनी सांगितलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

सतिश चिखलीकरच्या संपत्तीच्या सुरस कहाण्या ऐकल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आपल्या शैलीत तो मांडताना राज ठाकरे म्हणाले होते की, ‘आपल्याला शाळेतल्या गणितात प्रश्न असतात ना की, एक डझन आंब्यांना अमूक अमूक पैसे लागतात तर ... आंब्यांना किती पैसे... तसाच प्रश्न आहे की एका पीडब्लूडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तर पीडब्लूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल?’