पुण्यात पाणीबाणी

पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्याचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 27, 2013, 02:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्याचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.
सध्या पुण्यातील नागरिकांना दरडोई २०० लिटर पाणी मिळते. त्यात फरक पडण्याची शक्यता नाही, मात्र शहरामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांना काटकसरीने वापरावं लागणार आहे. समाविष्ट गावांमध्ये प्रचंड संख्येनं बांधकाम होत आहेत. महापालिकेच्या सध्याच्या वितरण यंत्रणेतून सर्वाना पुरेसं पाणी पुरवणं शक्य नाही.

अनेक ठिकाणी नागरिकांनी अनधिकृत नळजोड घेतलेले आहेत. त्यांचे नळजोड दंड आकारून नियमित करण्यात येणार आहेत. दरम्यान १ एप्रिल २०१३ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना नळजोड न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक नळजोड मीटर नेच देण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.