डॉ. दाभोलकरांच्या हत्येला दोन महिने पूर्ण, तपास कुणीकडे?

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाविषयी पोलिसांची बोलती बंद अशी अवस्था झालीय. दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन महिने झालेत. तरीही मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 20, 2013, 08:23 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाविषयी पोलिसांची बोलती बंद अशी अवस्था झालीय. दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन महिने झालेत. तरीही मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आलंय.
इतके दिवस या प्रकरणाताचा तपास योग्य दिशेनं सुरु आहे, असं सांगणारे पोलीस आता या विषयावर बोलायलाही तयार नाहीत. पोलिसांच्या नेमबाजी स्पर्धेच्या निमित्यानं आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी या विषयाच्या प्रश्नाला बगल दिली. इतकंच नाही तर पत्रकारांनी हा प्रश्न विचारल्याबद्दलची नाराजी त्यांच्या बोलण्यात जाणवली.
पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्र जारी केलं. मात्र तब्बल दोन महिने उलटूनही मारेकरी मोकाट असल्याने जनतेमध्ये संतापाची भावना आहे.
पोलिसांची १९ पथकं मारेकऱ्यांना पकडण्यासाठी कार्यरत आहेत, पण अजून त्यांच्या हाती काही लागलेलं नाहीय. विशेष म्हणजे दाभोलकरांच्या हत्येचा तपास करत असताना इतर काही गुन्हातील आरोपींचा शोध पोलिसांना लागला, मात्र दाभोलकरांचे मारेकरी अजूनही हाती लागले नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.