www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला. निमित्त होतं त्रिपुरारी पोर्णिमेचं...
बोचरी थंडी असतानाही हजारो मिणमिळत्या पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकरांनी पंचगंगा घाटावर मोठी गर्दी केली होती. कोल्हापूरातील विवीध सामाजिक सेवा संस्था आणि नागरीकांच्या वतीनं दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर हजारो पणत्या प्रज्वलित करुन आनंद साजरा केला जातो.
यंदाही बोचरी थंडी असतानाही कोल्हापूरकर आवर्जुन पहाटे पंचगंगा घाट परीसरात दाखल झाले. सुरवातीला पंचगंगा घाट परिसरामध्ये आकर्षक आणि मनमोहक अशा रागोळ्या काढण्यात आल्या होत्या. यामध्ये कोल्हापूरच्या विवीध प्रश्नांवर काढलेल्या रांगोळ्यांनी संपूर्ण कोल्हापूरकराचं लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. त्यानंतर ‘ज्योत से ज्योत मिलाओ’ याप्रमाणे प्रत्येक जण एक एक पणती प्रज्वलित करत पंचगंगा घाट परिसर पन्नास हजारांहून अधिक पणत्यांनी उजळून टाकला.
यामध्ये वृद्ध, तरुण, महिला आणि लहान मुलांच्या सहभाग होता. हजारो पणत्यांचे प्रज्वलन झालेलं दृष्य मनाला मोहीत करणारं असं होतं. याचवेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यामुळं दिपोत्सोवाला आणखी रंगत आली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.