राहुल गांधींच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थी वेठीला

राहुल गांधींच्या स्वागतासाठी शाळेतल्या मुलांना संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून विमानतळावर वेठीस धरण्यात आलंय. राहुल गांधी पुण्यात येणार यासाठी काँग्रेसच्या काही चमको कार्यकर्त्यांच्या या अट्टाहासापायी या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना विमानतळावर ताटकळत ठेवण्यात आलंय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 24, 2013, 09:22 PM IST

www.24taas.com, झी २४ तास, पुणे
राहुल गांधींच्या स्वागतासाठी शाळेतल्या मुलांना संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून विमानतळावर वेठीस धरण्यात आलंय. राहुल गांधी पुण्यात येणार यासाठी काँग्रेसच्या काही चमको कार्यकर्त्यांच्या या अट्टाहासापायी या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना विमानतळावर ताटकळत ठेवण्यात आलंय..
नागपूरमध्ये दाखल झालेले राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात पोहोचणार आहेत. पुण्यात उद्या ते कार्यकर्ते आणि पदाधिका-यांच्या बैठका घेणार आहेत. अशा ३ बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात सकाळी साडेआठ वाजल्यापासून या बैठका सुरू होतील. या बैठकांसाठीची पूर्ण तयारी झालीय.
पक्षसंघटन आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने या भेटी होणार आहेत. त्यामुळे हा पक्षपातळीवरचा कार्यक्रम आहे, सार्वजनिक नाही असं पक्षाने स्पष्ट केलंय. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे. त्यामुळे राहुल यांच्या दौ-याने काय परिवर्तन येणार असा प्रश्न पडलाय.
(Zee Media)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.