www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
नवरात्रोत्सव आवघ्या काही दिवसावर येवुन ठेपलाय. त्यामुळं साडेतीन शक्तीपिठापैकी एक महत्वाचे पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झालीय. सध्या मंदिराच्या रंगरंगोटीचं काम सुरु आहे.
कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात होणारा नवरात्रोत्व हा जगभरातल्या भाविकांच्या श्रद्धेचा आणि आकर्षणाचा विषय असतो. मंदिरात येणा-या भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी संध्या मंदिरात सुरु झालीय.मंदिराच्या कळसाच्या रंगरंगोटीच काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तांना सुरळीत दर्शन घेता यावं म्हणुन पश्चीम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीनं योग्य ती खबरदारी घेतली जातीय.
महालक्ष्मी मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव दोन दरवाजे यापूर्वीच बंद करण्यात आलेत. आता मंदिर परीसरात सी.सी.टीव्हीची संख्याही वाढविण्यात आलीय.नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी आवश्यक ती खबरदारी आतापासूनच घेण्यात येत आहे.
(Zee Media)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.