महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेत वाढ

बुद्धगयेला झालेल्या साखळी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 9, 2013, 05:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
बुद्धगयेला झालेल्या साखळी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने आणि जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी महालक्ष्मी मंदिर परिसरातल्या सुरक्षेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिरातले सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर यांचीही पाहणी केली. दरम्यान अति दक्षतेची काळजी घेत मंदिरात येणा-या भाविकांची कसून तपासणी करण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिलेत.
त्याचबरोबर मंदिर परिसरात तसंच अन्य ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं खबरदारी घेतली असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितंल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.