पश्चिम घाट बचाव मोहमेच्या वार्षिक परिषदेला सुरूवात

पश्चिम घाट बचाव मोहिमेच्या वार्षिक परिषदेला शुक्रवारपासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर इथं सुरूवात झाली. पश्चिम घाटातलं पर्यावरण वाचविण्यासाठी 25 वर्षांपूर्वी निघालेल्या ऐतिहासिक पदयात्रेच्या आठवणींना या परिषदेत उजाळा देण्यात आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 1, 2012, 10:51 PM IST

अनंत सोनावणे, www.24taas.com, महाबळेश्वर
पश्चिम घाट बचाव मोहिमेच्या वार्षिक परिषदेला शुक्रवारपासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर इथं सुरूवात झाली. पश्चिम घाटातलं पर्यावरण वाचविण्यासाठी 25 वर्षांपूर्वी निघालेल्या ऐतिहासिक पदयात्रेच्या आठवणींना या परिषदेत उजाळा देण्यात आला.
महाबळेश्वरात पश्चिम घाट बचाव मोहिमेनिमित्त संवर्धनासाठी झगडणारे पर्यावरणवादी एकत्र आलेत. लोकसहभागातून विकास साधत पर्यावरण संतुलन कसं राखता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
25 वर्षांपूर्वी पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या आठवणी यावेळी जागविण्यात आल्या. भविष्यात सहा राज्यांमधल्या पर्यावरणवाद्यांनी एकत्र काम करावं, असा संकल्प करण्यात आला.