www.24taas.com, झी मीडिया, पुणे
बेदरकारपणे एस टी चालवून ९ जणांचे बळी घेणाऱ्या चालक संतोष माने याला दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. संतोषची फाशीची शिक्षा आज पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली.
स्वारगेट स्थानकातून एसटी आपल्या ताब्यात घेऊन बेदरकारपणे चालवून ९ जणांचा चिरडले होते. संतोष हा मूळचा राहणारा हा कैठाले, जि. सोलापूर येथील आहे. याची संतोष याने २५ जानेवारी२०१२ रोजी पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवली होती. त्यात नऊ जण ठार झाले तर ३५ जण गंभीर जखमी झाले होते. संतोषवर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.
याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याने फाशीच्या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर झाली. आरोपीस शिक्षा देण्यापूर्वी काहीही विचारले नाही, ही अत्यंत गंभीर चूक आहे. न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून घेणे बंधनकारक होते हे निदर्शनास आणून देऊन त्याची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी संतोष मानेचे वकील जयदीप माने यांनी खंडपीठाकडे केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली आणि हा खटला शिक्षेबद्दलच्या फेरचौकशीसाठी पुणे न्यायालयात वर्ग केला होता. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०१३ पासून खटल्याच्या फेरचौकशीला सुरवात झाली. आरोपी मनोरुग्ण आहे व तो जबाब देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे की नाही याची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी आरोपीतर्फे अॅड. धनंजय माने यांनी केली. त्यानुसार येरवडा मेंटल हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांच्या पथकाने संतोष माने याची तपासणी केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.