संजय दत्तची येरवड्यात रवानगी

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी संजय दत्त याला आज पहाटे आर्थर रोडमधून येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलंय. गुरुवारी, १६ मे रोजी त्यानं टाडा कोर्टासमोर शरणागती पत्करली होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 22, 2013, 09:55 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी संजय दत्त याला आज पहाटे आर्थर रोडमधून येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलंय. गुरुवारी, १६ मे रोजी त्यानं टाडा कोर्टासमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्याला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधल्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
संजयला येरवड्याला कधी हलवणार, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. संजयला कसाबच्या अंडा सेलमध्ये ठेवल्यामुळे तो रडल्याचंही वृत्त आलं होतं. त्यानंतर गृह मंत्रालयानं त्याला लवकरात लवकर येडवड्याला हलवण्याचे आदेश जेल प्रशासनाला दिले होते. अखेर, आज पहाटे त्याची पुण्याच्या येरवड्यात रवानगी करण्यात आलीय.

मंगळवारी संध्याकाळी त्याची बहीण खासदार प्रिया दत्त यांनी आर्थर रोडला जाऊन संजयची भेट घेतली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.