सांगली महापौरांच्या घरावर आयकरचे छापे

राज्यात दुष्काळ असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही थाटात लग्नाचा बार उवून दिला. या थाट राष्ट्रवादीच्या मंत्र्याना आणि महापौरांना चांगलाच महागात पडलाय. तर एका कंत्राटदारालाही शाही विवाह अडचणीचा ठरलाय. या सर्वांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 20, 2013, 04:25 PM IST

www.24taas.com,सांगली
राज्यात दुष्काळ असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही थाटात लग्नाचा बार उवून दिला. या थाट राष्ट्रवादीच्या मंत्र्याना आणि महापौरांना चांगलाच महागात पडलाय. तर एका कंत्राटदारालाही शाही विवाह अडचणीचा ठरलाय. या सर्वांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.
राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर तर त्यांना मदत करणारे शहा कंत्राटदार यांच्या कराड येथील घर आणि हॉटेलवर छापा टाकण्यात आला. त्यानंतर आज सांगलीचे महापौर इंद्रिस नायकवडी यांच्या घरावर आयकरच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यामुळे राज्यातील शाही विवाह सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
मुलांच्या शाही विवाह सोहळ्यात उधळपट्टी करणा-या राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यानंतर आता दुष्काळग्रस्त सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांच्या घरावरही आयकर खात्याची वक्रदृष्टी पडली. आयकर खात्याच्या अधिका-यांनी नायकवडी यांच्या घरावर छापे टाकले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोठात चलबिचल सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेश धाब्यावर बसवून शाही विवाह पार पडले होते. त्यामुळे शरद पवारही नाराज होते.

सांगली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. पाण्यासाठी, जनावरांच्या चा-यासाठी सरकार दरबारी साकडे घातले जात आहे. मात्र याचे जराही भान न ठेवता शहराचे महापौर इद्रिस नायकवडी यांनी रविवारी आपल्या मुलाचे लग्न शाही थाटात करून कोट्यवधींची उधळपट्टी केली होती.
नायकवडी यांनी मुलाच्या लग्नात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले होते. तर मिरजमधील महापालिकेच्या शाळेच्या प्रांगणात २७०० किलो मटनाची पंगत उठली होती. सुमारे ४० हजार लोकांनी शाही भोजनाचा लाभ घेतला होता. तर जाधव यांच्याही शाही थाटातील विवाहात कोट्यवधीचा खर्च झाला होता.