www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूरात चोरीच सत्र सुरूच आहे. काल मध्यरात्री शहराजवळील आऱ.के.नगर परीसरात असणा-या स्टेट बॅक ऑफ इंडीयाचं ए.टी.एम चोरट्यांनी फोडलं आहे.
तर ए.टी.एम जवळ असणा-या रत्नाप्पाआण्णा कुंभार पतसंस्थेतील अख्खी तिजोरीच चोरांनी लंपास करुन पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलय.कोल्हापूर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसापासुन चोरीच सत्र सुरु होतं. त्यात आर.के.नगर इथल्या ए.टी.एम मशिनच्या ठिकाणी एक सिसीटीव्ही सोडला तर अन्य कोणताही ठिकाणी सिसीटिव्ही नसल्याचं पाहुन चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं ए.टी.एम मशीन फोडलंय.
तर पतसंस्थेतही सीसीटीव्ही नसल्याचं पाहुन चोरट्यांनी अख्खी तिजोरीच लंपास केलीय.कोल्हापूर जिल्हयात दर चार - पाच दिवसाला छोट्या मोठ्या चो-या सुरुच आहेत.तरीही कोल्हापूर पोलीसांना चोरचं सत्र रोखण्यात यश आलेलं नाही,त्यामुळं नागरीकांतून संताप व्यक्त होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.