साताऱ्य़ात पोलिसाने पोलिसालाच हॉकी स्टिकने बडवलं!

सातारा पोलीस मुख्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून काम करणा-या पोलिस कॉन्स्टेबल अविनाश भोकरे या कर्मचा-यास पोलीस अधीक्षक के. एम. प्रसन्ना यांनी हॉकी स्टिकनं मारहाण केलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 22, 2013, 09:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
सातारा पोलीस मुख्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून काम करणा-या पोलिस कॉन्स्टेबल अविनाश भोकरे या कर्मचा-यास पोलीस अधीक्षक के. एम. प्रसन्ना यांनी हॉकी स्टिकनं मारहाण केलीय.
एका गोपनीय अहवालावर चर्चा करत असताना अविनाश भोकरे आणि पोलीस अधीक्षकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्यातून चिडून पोलिस अधिक्षकांनी सदर लिपीकास मारहाण केल्याची माहिती आहे. जखमी कर्मचा-यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र याबाबत सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये कुठलीही फिर्याद अद्याप नोंदवलेली नाही.
आजच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन पोलिस आपापसात भिडल्याची खळबळजनक दृश्य थेट कॅमेऱ्यावर चित्रित झाली आहेत. अशा प्रकारे जर पोलिसच आपापसात भिडणार असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहणार तरी कसं असा सवाल उपस्थित होतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.