राष्ट्रवादीला उदयनराजेंची अॅलर्जी, महापौरांनी काढला पळ!

राष्ट्रवादी काँग्रेसला उदयनराजे भोसले यांची किती ऍलर्जी आहे... याचं उदाहरण पुणे महापालिकेत समोर आलंय... त्याचबरोबर उदयनराजे यांच्याविषयी बोलायला राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसे घाबरतात हेसुद्धा पहायला मिळालं. एका पेन्टिंगवरुन हा सगळा गोंधळ झालाय.....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 27, 2013, 07:24 AM IST

www.24taas.com, नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसला उदयनराजे भोसले यांची किती अॅलर्जी आहे... याचं उदाहरण पुणे महापालिकेत समोर आलंय... त्याचबरोबर उदयनराजे यांच्याविषयी बोलायला राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसे घाबरतात हेसुद्धा पहायला मिळालं. एका पेन्टिंगवरुन हा सगळा गोंधळ झालाय.....

पुण्याच्या महापौर वैशाली बनकर यांनी मीडियापासून लपण्यासाठी आज अक्षरशः पळ काढला. पुण्याच्या महापौरांनी असा पळ काढण्यमागचं कारण म्हणजे, त्यांना माध्यमांना टाळायचं आहे. पुण्याच्या महापौरांना माध्यमांना का टाळायचं.... तर, त्यामागचं कारण आहे, राष्ट्रवादीचेच खासदार उदयनराजे भोसले... .. पुणे महापालिका छत्रपती संभाजी महाराजांचं तैलचित्र साकारतेय. त्याचं उदघाटन उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात यावं, असा प्रस्ताव नेते सुभाष जगताप यांनी दिला होता.
हा प्रस्ताव मंजूरही करण्यात आला. उदयनराजेंच्या हस्ते तैलचित्राचं अनावरण होणार हे निश्चित झालं... मात्र, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंच घूमजाव केलंय. तैलचित्राचं अनावरण उदयनराजेंच्या हस्ते करण्याएवजी शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करावं, असा फेरप्रस्ताव राष्ट्रवादीनं दिला.
विशेष म्हणजे हा फेरप्रस्तावही सुभाष जगताप यांनीच दिला. बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादीने प्रस्ताव मंजूरही करून घेतला...
उदयनराजेंना उदघाटनाला बोलावलं, तर हायकमांडमध्ये काय प्रतिक्रिया उमटू शकते, याची उपरती राष्ट्रवादीच्या नेत्यांना जरा उशिराच झाली.... पण या बदललेल्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली तर उदयनराजेंचा कोप होण्याची भीती....उदयनराजेंच्या विरोधात बोललं तर काय प्रतिक्रिया उमटू शकते याचा अनुभव राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी एकदा घेतलाय. त्यामुळेच सुभाष जगताप यांनी फोन बंद ठेवत, महापालिकेत येण्याचंच टाळलं.
तर, दुसरीकडे महापौरांची माध्यमांना टाळण्यासाठी अशी पळापळ सुरु होती... त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजितदादांची हुकुमत असली तरी, उदयनराजेंचीही तेवढीच दहशत असल्याचं सिद्ध झालंय

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.