डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि 'साधना' साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. ते सकाळी फिरायला गेले असत्या त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 20, 2013, 03:40 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि 'साधना' साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. ते सकाळी फिरायला गेले असत्या त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यातीतल ओंमकारेश्वर मंदिराजवळ हा हल्ला आज सकाळी झाला. यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांना तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात येत असताना त्यांचे निधन झाले.

महाराष्ट्रात जादूटोणा विधेयकाला अनेकांचा विरोध होता. मात्र, हे विधेयक व्हावे यासाठी दाभोलकर यांची इच्छा होती. जादूटोणा विरोधातील कायदा व्हावा यासाठी डॉ. दाभोलकर प्रयत्नशील होते. ७ जुलै १९९५ला युती शासनाने या विधेयक मांडले होते. मात्र, गेल्या १८ वर्षांपासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत विधेयक रखडलेले आहे.
बाबा आढाव यांच्या 'एक गाव- एक विहीर' या चळवळीत नरेंद्र दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ साली स्थापन झालेल्या 'अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संमिती'मध्ये कार्य सुरू केले.
१९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या 'साधना'या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून संपादक होते.
त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या एकाच विषयाला स्वत:ला बांधून घेतलं. पुढे १९८२मध्ये ते या चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले आणि त्यातूनच १९८९मध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना डॉक्टरांच्याच पुढाकाराने झाली. या सार्‍या काळात डॉक्टरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना महाराष्ट्रातील गाव अन गाव पिंजून काढला. हजारो व्याख्यानं दिली. शेकडो शिबिरं घेतली. तितक्याच संख्येनं बुवाबाजी करणार्‍यांविरोधात वाद ओढवून घेतले आणि त्यांना समर्थपणे उत्तरंही दिली. असंख्य लेख आणि डझनभर पुस्तकं लिहिली.
नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण तर १९७० मध्ये मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
साहित्य संपदा
अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
अंधश्रद्धा विनाशाय
ऐसे कैसे झाले भोंदू
झपाटले ते जाणतेपण - संपादक नरेंद्र दाभोलकर व विनोद शिरसाठ.
ठरलं... डोळस व्हायचंय
तिमिरातुनी तेजाकडे
प्रश्न मनाचे (सहलेखक. डॉ हमीद दाभोलकर)
भ्रम आणि निरास
विचार तर कराल?
विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी
श्रद्धा-अंधश्रद्धा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ