www.24taas.com, झी मीडिया, पुणे
‘टाळी ही उत्स्फूर्त असते... ती मागायची नसते… हल्ली मागूनही टाळ्या मिळत नाहीत’ अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘टाळी’ प्रकरणाला टोला लगावलाय. शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या ‘दे टाळी’ विषयावर नानानं राजगुरूनगरमधल्या कार्यक्रमात ही टिप्पणी केली.
प्रसिध्द अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते पुण्यात दृश्यकला कोशाचे प्रकाशन करण्यात आलं. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती दीपक टिळक हे यावेळी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील दृश्यकलेच्या २०० वर्षांच्या इतिहासाची माहिती या कोशामध्ये मिळणार आहे. द्र्ष्याकलेवरील अशा प्रकारचा कोश प्रथमच प्रकाशित करण्यात आला आहे. या कोशात ३०५ चित्रकार, शिल्पकार, व्यंगचित्रकार यांची चरित्रे या कोशामध्ये आहेत.
चरित्रनायाकांच्या छायाचित्रांसह त्यांच्या कलाकृतींची ८०० चित्रे या कोशा म्ह्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. १८८ रंगीत चित्रांचा समावेश असलेला `कालासंचीत` हा स्वतंत्र विभाग या कोशामध्ये आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.