www.24taas.com,झी मीडीया, कोल्हापूर
पाकिसतान सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये दाखल झालंय. काल विशेष विमानानं मानेंचं पार्थीव दिल्लीहून पुण्यात आणण्यात आलं त्यानंतर पहाटे पार्थीव कोल्हापूरातील मराठा लाईट इन्फेन्ट्रीमध्ये दाखल झालं. आणि तिथून त्यांना पिंपळगावकडे रवाना करण्यात आलं.
पिंपळगाव बुद्रुक येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथले रहिवासी असलेल्या मानेंच्या मृत्युनं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावरच शोककळा पसरलीय. या नापाक हल्ल्याचे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतोय.
मात्र खरा सवाल आहे तो भारत सरकारपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांचा आक्रोश पोहचणार आहे का? भारत पाकला आता तरी धडा शिकवणार का असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे. शहीद कुंडलिक माने यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत मुख्यमंत्री पृ्थ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलीये.
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या कागल तालुक्याचे कुंडलिक माने शहीद झालेत. राज्य सरकारनं मदतीची घोषणा केली असली तरी ज्या कोल्हापूरच्या सुपुत्रानं देशासाठी प्राण गमावले आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी माने कुटुंबियांना मदत देतील का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.