नगरसेवकांना वेध मानधनवाढीचे!

पिंपरी-चिंचवडमधल्या नगरसेवकांना आता मानधनवाढीचे वेध लागलेत. प्रति महिना पंचवीस हजार मानधन करावं, अशी त्यांची मागणी आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 17, 2013, 09:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवडमधल्या नगरसेवकांना आता मानधनवाढीचे वेध लागलेत. प्रति महिना पंचवीस हजार मानधन करावं, अशी त्यांची मागणी आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला.
आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतले नगरसेवक मात्र गरीब असल्याची जाणीव सत्ताधा-यांना झालीय. म्हणूनच नगरसेवकांचं मानधन साडे सात हजारांवरुन पंचवीस हजारांवर नेण्याचा प्रस्ताव स्थायीमध्ये आयत्यावेळी समोर आला.
या वाढीव मानधनाच्या प्रस्तावावरुनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये क्रेडिट वॉर रंगलंय.
आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.