पुणे: पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडीवर बलत्काराची घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. 24 तारखेला संध्याकाळी सात च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर 25 तारखेला चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्काराबरोबर या युवतीकडील मोबाईल , एटीएम कार्ड आणि रोख रक्कम देखील चोरण्यात आली. ही तरुणी परराज्यातील आहे. शिक्षणासाठी ती पुण्यात आली आहे.
हद्दीच्या वादावरून गुन्हा दाखल करण्यास उशिर झाल्याची माहिती मिळतेय. घटना घडलेली जागा कोणत्या पोलीस स्टेशन च्या हद्दीत येते यावरुन डेक्कन आणि चतुर्श्रुगी पोलीस ठाण्यात वाद रंगला. त्यामुळे या दोन पोलीस ठाण्यांनी सुरवातीला तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. अशी माहिती समोर येतेय.
असं असलं तरी हद्दीवरून कोणताही वाद झाला नसल्याची प्रतिक्रिया चतुर्श्रुंगी पोलिसांनी दिली आहे.