कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवा वाद

करवीर निवासीनी महालक्ष्मीच्या प्रसादावरुन नवा वाद निर्माण झालाय. देवीच्या प्रसादाचा लाडु कैदी महिलांकडून बनवुन घेण्यावरुन हा नवा वाद उफाळलाय.

Updated: Feb 26, 2016, 10:18 AM IST
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवा वाद title=

प्रताप नाईक (कोल्हापूर): करवीर निवासीनी महालक्ष्मीच्या प्रसादावरुन नवा वाद निर्माण झालाय. देवीच्या प्रसादाचा लाडु कैदी महिलांकडून बनवुन घेण्यावरुन हा नवा वाद उफाळलाय.

महालक्ष्मीच्या लाडूंचा प्रसाद महिला कैद्यांकडून तयार करुन घ्यावा, असा निर्णय प्रश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमीत सैनी यांनी घेतलाय. त्यासंदर्भात कळंबा कारागृहातल्या महिलांशी त्यांची प्राथमिक चर्चाही झालीय. पण देवस्थान समितीतल्या अनेक सदस्यांना जिल्हाधिका-यांचा हा निर्णय मान्य नाही.

तर दुसरीकडे अंबाबाईचा प्रसाद म्हणून पूर्वी फुटाणे, तिळगुळ आणि बत्ताशे मंदिराकडून दिले जात होते. मात्र 1990 च्या दशकात कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरुपतीची पत्नी म्हणून नावारुपाला आणण्याचा घाट पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधल्या काही सदस्यांनी घातला. त्यानंतर देवस्थान समितीनं अंबाबाईचा फुटाणे, तिळगुळ आणि बत्ताशे हा प्रसाद बदलून दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे प्रसाद म्हणून लाडू द्यायाला सुरवात केली.

कोल्हापूरची अंबाबाई ही विष्णुपत्नी महालक्ष्मी नसल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कबूल केलंय. त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाईचा प्रसाद हा फुटाणे, तिळगुळ आणि बत्ताशे असताना लाडूच्या प्रसादाचा घाट का घातला जातोय हा भाविकांचा प्रश्न आहे.