www.24taas.com, पुणे
उसाला दर देण्याबाबत कारखान्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा ही कारखान्यांच्या मुळावर येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.
पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी दादांनी ऊस कारखान्यांच्या बाबतीत ही भविष्यवाणी केलीय. शेतकरी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे ऊसाला दर देणंही अशक्य आहे, असंही अजित पवार म्हणाले.
तर दुसरीकडे अजित पवारांच्या या विधानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केलीय. जे उत्तर प्रदेश सरकारला जमलं ते राज्य सरकारला का जमत नाही? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केलाय.