मनसेचा पुण्यात `अंडे का फंडा`… कार्यक्रम उधळला

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचं हे आंदोलन आणि घोषणाबाजी सुरु आहे ती चक्क अंड्यांच्या विरोधात. मनसेचं हे आंदोलन अंड्यांच्या विरोधात होतं. जागतिक `वर्ल्ड एग्स डे` निमित्त पशुसंवर्धन विभागानं शाळेतल्या विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी देण्याचं ठरवलं होतं. मनसेला मात्र हे अंडे वाटप पचलं नाही. त्यांनी अंडी वाटपाचा कार्यक्रम सुरु होण्याआधीच उधळून लावला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 12, 2013, 01:45 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
`संडे हो या मंडे, रोज खावो अंडे`… ही जाहिरात सगळ्यांनाच आठवत असेल.... पण अंडं कधी खायचं, यावरूनच पुण्यात राजकारण रंगलं. पुण्यातला मनसेचा`अंडे का फंडा`…
पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचं हे आंदोलन आणि घोषणाबाजी सुरु आहे ती चक्क अंड्यांच्या विरोधात. मनसेचं हे आंदोलन अंड्यांच्या विरोधात होतं. जागतिक `वर्ल्ड एग्स डे` निमित्त पशुसंवर्धन विभागानं शाळेतल्या विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी देण्याचं ठरवलं होतं. मनसेला मात्र हे अंडे वाटप पचलं नाही. त्यांनी अंडी वाटपाचा कार्यक्रम सुरु होण्याआधीच उधळून लावला. त्यासाठी कारण दिलं नवरात्रीचं…

अजब प्रकार म्हणजे, फक्त हिंदू धर्मीय मुलांना अंडी द्यायला मनसेचा विरोध आहे. इतर धर्मीय मुलांना अंडी द्यायला त्यांची हरकत नाही. नवरात्र मध्ये अंडी खाऊ नयेत, असं मनसेचं तत्वज्ञान असेल तर त्यांनी जरा काँग्रेस भवनाच्या आवारात सुरू असलेला नवरात्र उत्सव पाहायला हवा होता. इथे देवीलाच माश्यांचा नैवैद दाखवला जातो. बरं हाही नवरात्र उत्सवच आहे… फरक एवढाच कि तो बंगाली लोकांचा आहे. याबाबत विचारल्यावर मनसेकडे काहीच उत्तर नव्हतं. मात्र ही अंडी शाकाहारी आहेत, असा पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांचा दावा आहे.

अंड शाकाहारी कि मांसाहारी. ते कधी खावं आणि कधी खाऊ नये हे कळण्याचं या विद्यार्थ्यांचं वय नाही… मनसेच्या विरोधानंतर शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी आणि अधिका-यांनी मात्र पळपुटी भूमिका घेतली. परिणामी महापालिका शाळांमधले हजारो विद्यार्थी मात्र अंड्याला मुकले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ