पंढरपुरात तीन लाख भाविक

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मळा फुललाय. 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. विठुरायाच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांनी रांगा लावल्यायेत. अवघी पंढरी पांडुरंगमय झालीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 27, 2012, 10:39 AM IST

www/24taas.com,पंढरपूर
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मळा फुललाय. 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. विठुरायाच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांनी रांगा लावल्यायेत. अवघी पंढरी पांडुरंगमय झालीय.
वारक-यांचं माहेरघर असलेल्या पंढरपुरात कार्तिकी वारीनिमित्त तीन लाख भाविक दाखल झालेत. परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापुजा होते. मात्र यावर्षी सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सपत्नीक पुजा केली.
वारक-यांचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूरच्या गगनबावडाच्या धर्मा कांबळे यांना शासकीय पुजेचा मान मिळाला. कार्तिक वारीनिमित्त राज्यातील चारा आणि पाण्याची समस्या सुटू दे असं साकडं विठूरायाला घातल्याचं पालकमंत्री ढोबळे यांनी सांगितलं.