सायनाची सिंधूवर मात

इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये शटलर क्वीन सायना नेहवालने विजयी सलामी दिलीय. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलला गवसणी घातलेल्या पी.व्ही.सिंधूला पराभूत करत सायनाने आपणच फुलराणी असल्याचं दाखवून दिलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 15, 2013, 11:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये शटलर क्वीन सायना नेहवालने विजयी सलामी दिलीय. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलला गवसणी घातलेल्या पी.व्ही.सिंधूला पराभूत करत सायनाने आपणच फुलराणी असल्याचं दाखवून दिलं. सायनाने सिंधूवर 21-19, 21-8ने मात केली.
पी.व्ही.सिंधू या नव्या फुलराणीचा उदय होणार अशीची काहीशी चर्चा सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांच्या लढतीपूर्वी रंगली होती. मात्र अखेर आपणच फुलराणी असल्याचं सायनाने आपल्या खेळाने सा-यांना दाखवून दिल. इंडियन बॅडमिंटन लीगमधील मोस्ट एवेटेड मॅच असं वर्णन करण्यात आलेल्या लढतीमध्ये सायनाने सिंधूला पराभूत करत विजयी सलामी दिलीय. हैदराबाद हॉटशॉट्सकडून खेळणा-या सायनाने अवधी वॉरियर्सकडून खेळणा-या सिंधूला 21-19, 21-8 अस सरळ गेममध्ये पराभूत केल. सिंधूने नुकत्याच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलला गवसणी घातल्याने सिंधू सायनावर भारी पडणार अशी चर्चा बॅडमिंटन वर्तुळात रंगली होती. मात्र अखेर अनुभवाच्या जोरावर सायनानेच बाजी मारली. दोन्हीही गेममध्ये सुरुवातीला आघाडीवर असलेल्या सिंधूवर सायनाने अनुभवाच्या जोरावर मुसंडी मारत सिंधूला पराभूत केलं.
पहिल्या गेममध्ये सुरुवातीला सिंधूने चांगलाच आक्रमक खेळ करत सा-यांना प्रभावित केल. मात्र, दुस-या गेममध्ये सिंधूची एकाग्रता भंगली आणि पुन्हा तिला तसा आक्रमकपणा दाखवण्यात अपयश आल यामुळेच दुसरा गेम तिला 21-8ने गमवावा लागला. दरम्यान विजयानंतर सायनाने पहिल्या गेममध्ये आपल्यावर दबाव होता अशी कबुली दिली. याचबरोबर सिंधूही आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू असून तिने चांगल्या खेळाच प्रदर्शन केल अस कौतुकही सायनाने केल. या लढतीमुळे एवढ मात्र स्पष्ट झाल की बॅडमिंटन विश्वात सिंधू या उदयोन्मुख खेळाडूचा उदय जरी होत असला तरी सायना नेहवाल अजून काही संपलेली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.