पुणे मॅरेथॉनवर केनियाचे वर्चस्व

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर केनियाच्या धावपटूंनी आपले वर्चस्व राखले आहे. महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्येही केनियाच्या लुका किपकेमोई चेलिमो या महिला धावपटूने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 2, 2012, 02:17 PM IST

www.24taas.com,पुणे
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर केनियाच्या धावपटूंनी आपले वर्चस्व राखले आहे. महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्येही केनियाच्या लुका किपकेमोई चेलिमो या महिला धावपटूने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी सुरूवात झाली. मॅरेथॉनचं यंदाचं २७वं वर्ष आहे. अलका टॉकिज चौकातून या मॅरेथॉनला सुरूवात झालीय. या स्पर्धेअंतर्गत ४२ किलोमीटरची मुख्य मॅरेथॉन, अर्धमॅरोथॉन आणि लहान मुलांसाठी आणि अपंगासाठी अशा विविध प्रकारात स्पर्धा पार पडल्या.
केनियाच्या किरुई सिमॉन किपरुगुट दुसऱ्या स्थानावर आला. इथोपियाचा धावपटू दानेल अस्चेनिक डेरेसे तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये केनियाची धावपटू कामुलू हॉलिने कवेके पहिल्या तर पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये युथोपियाचा मेलाकू बेलाचेव प्रथम पटकाविला.
वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुरेश कलमाडी, लंडन ऑलिंपिकमधील सुधा सिंग, अभिनेता चंकी पांडे, अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते निशाण दाखवून स्पर्धेची सुरूवात झाली. या शर्यतीच्या निमित्ताने देशात सर्वाधिक मॅरेथॉन आयोजित करण्याचा विक्रम पुण्याच्या नावावर नोंदविला गेला आहे. नेहरू स्टेडियम येथे स्पर्धेचा समारोप झाला. सुरेश कलमाडी आणि सुधा सिंग यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.