www.24taas.com,मुंबई
शिवसेनेच्या निदर्शनांमुळे मुंबईत होणारे हॉकी लीगचे सामने धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या सामने अन्यत्र हलवण्याबाबत विचार सुरू असल्याचं मुंबई हॉकी असोसिएशनचे सेक्रेटरी रामसिंग राठोड यांनी म्हटलंय.
हॉकी इंडिया लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागाला विरोध करत शिवसेनेनं मुंबईत हॉकी असोसिएशनच्या स्टेडियममध्ये जोरदार हंगामा केला. मुंबई मॅजिशियन संघात ४ पाकिस्तानी खेळाडू खेळणार आहेत. तर एकूण ९ पाकिस्तानी खेळाडूंना काल व्हीसा मंजूर झालाय.
काश्मीरमध्ये पाकिस्तानकड़ून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय आणि वारंवार गोळीबार केला जातोय. दोन सैनिकांचं शीर कापून नेण्यापर्यंत पाकिस्तानी सैनिकांची मजल गेलीये. अशा स्थितीत पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळू देऊ नये, अशी मागणी शिवसेनेनं केलीय.
हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबई मॅजिशियन संघाकडून खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावर शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे. याविरोधात मुंबईतील हॉकी स्टेडियमवर हंगामा केलाय. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
आयपीएलच्या धर्तीवर भारतात हॉकी इंडिया लीग होत आहे.
भारतात होत असलेल्या हॉकी इंडिया लीगमध्ये यानिमित्ताने नवा वाद उद्भवला आहे. मुंबई हॉकी असोसिएशनच्या स्टेडियमवर पाकिस्तानी हॉकीपटू सराव करत होते. यावेळी शिवसेनेने हॉकी स्टेडियमवर धाव घेत निदर्शनं केली.