www.24taas.com, पॅरिस, झी मीडिया
टेनीसमधली ब्युटी क्वीन मारिया शारापोव्हानं सलग दुस-या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शारापोव्हानं बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काचा 6-1,2-6,6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
या मॅचमध्ये पहिला सेट सहज जिंकत शारापोव्हानं झोकात सुरुवात केली. मात्र दुस-या सेटमध्ये अझारेन्काला सूर गवसला. तिनं दुसरा सेट शारापोव्हाची सर्व्हिस ब्रेक करत जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये शारापोव्हानं आपल्या चतुरस्त्र खेळाचं प्रात्याक्षिक दाखवत सामना खिशात टाकला. आता तिची फायनलमध्ये सेरेना विल्यमशी लढत होणार आहे.
फ्रेंच ओपन स्पर्धेत शनिवारी महिला एकेरीमध्ये मारिया शारापोव्हा आणि सेरेना विल्यम्स यांच्यात फायनल लढत होणार आहे. सेरेनानं इटलीच्या सारा इराणीचा ६-०, ६-१ असा पराभव करत फायनल गाठलीय. १५ गॅँड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेनाचा मागच्या वर्षी पहिल्याच फेरीत पराभव झाला होता. यंदा मात्र विजेतेपद पटकावण्याचा निर्धार सेरेनानं केलाय. या संपूर्ण स्पर्धेत तिनं केवळ एकच सेट गमावलाय. तर दुसरिकडं शारापोव्हा देखील फॉर्मात असून सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच विजेतेपद पटकावण्याचा निर्धारानं ती मैदानात उतरेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.