मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या त्याची गर्लफ्रेंड अनुष्कासह सुट्टी एंजॉय करतोय. विराट आणि अनुष्का गोव्याच्या सफरीवर आहेत. त्यांच्यासोबत सहकारी सलामीवीर शिखर धवन आणि त्याची पत्नीही आहे.
यादरम्यान मुंबई एयरपोर्टवरुन अनुष्कासह बाहेर पडत असताना मीडियाला पाहताक्षणीच विराटने आपले तोंड लपवले. एयरपोर्टवरुन बाहेर पडत असताना मीडिया आता आपल्याला नक्कीच काहीतरी प्रश्न विचारणार या विचाराने विराटने हातातल्या बॅगेच्या सहाय्याने आपले तोंड लपवून घेतले. विराटच्या या कृतीने अनुष्काला मात्र हसू आवरले नाही.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत सध्या १-० अशा आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी २५ नोव्हेंबरला सुरु होणार आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी विराटला मिळालेली सुट्टी तो चांगलीच एंजॉय करतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.