www.24taas.com, झी मीडिया, पॅरिस
सातवेळचा फॉर्म्युला- वन वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शुमाकरचा स्किईंग करतांना अपघात झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पॅरिसमध्ये स्किईंग करतांना त्याचा हा अपघात झाला. जखमी झाल्यानंतर शुमाकर जखमी झाल्यानंतर कोमात गेलाय. त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.
शुमाकरचं डोकं दगडाला आपटलं आणि यातच तो गंभीर जखमी झालाय. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आलेत. हेल्मेट घातल्यानंतरही शुमाकरचा अपघात कसा झाला याचा तापस सुरु करण्यात आलाय.
शुमीचा अपघात झाल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. फॉर्म्युला वन करिअरमध्ये शुमाकरनं रेकॉर्डब्रेक ९१ रेसेस जिंकल्या आहेत. ४४ वर्षीय शुमाकरनं २००६मध्ये निवृत्ती घेतेल्यानंतर पुन्हा रेस ट्रॅकवर कमबॅक केलं होतं. मात्र, त्याचं कमबॅक फारसं यशस्वी झालं नाही आणि त्यानं २०१२ मध्ये पुन्हा फॉर्म्युला वनला अलविदा केला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.