www.24taas.com, इम्फाळ
सुपरमॉम मेरी कोमने लंडन ऑलिम्पिक-२०१२मध्ये ब्राँझ मेडल जिंकून भारातीय बॉक्सिंगला ग्लॅमर मिळवून दिले आहे. त्यामुळे भारतीयांचे लक्ष आता बॉक्सिंगसारख्या खेळाकडे वळले आहे. मेरी कोम ही बॉक्सर्सची प्रेरणा ठरली आहे. मात्र आपल्या मुलांनी आपल्यासारखं बॉक्सर होऊ नये, असं मत मेरी कोमने व्यक्त केलं.
कुठल्या आईला आपल्या मुलांना ठोसे खाताना, जखमी होताना कुठल्या आईला बघवेल? म्हणूनच माझ्या मुलांनी बॉक्सर होऊ नयेत, असं मला वाटतं.असं मत मेरी कोमने व्यक्त केलं. माझी मुलांना मी करीअर निवडीची जबरदस्ती करणार नाही. त्यांना ज्या क्षेत्रात काम करायची इच्छा असेल, त्या क्षेत्रात ते काम करतील, असंही मेरी कोम म्हणाली.
या प्रसंगी तिच्यासोबत पती ओनलर कोम, आई अखम कोम आणि दोन्ही मुलेसुद्धा होती. भारतात परतल्यावर जनतेकडून मिळालेला प्रतिसाद पाहून मेरी कोम भाराऊन गेली. मंत्रालयाकडूनही मेरी कोमचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याने मेरी कोम भाऊक झाली. आता यापुढील लक्ष्य रियो ऑलिम्पिक असेल असं मेरी कोमने सांगितलं.