‘अनब्रेकेबल’ मेरी कोमचं आत्मचरित्र, बिग बींच्या हस्ते प्रकाशन!

भारताची ‘क्वीन ऑफ बॉक्सिंग रिंग’ म्हणजेच मेरी कोमची कथा आता पुस्तकरुपात जगासमोर आलीय. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘अनब्रेकेबल’ या मेरीच्या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 10, 2013, 02:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताची ‘क्वीन ऑफ बॉक्सिंग रिंग’ म्हणजेच मेरी कोमची कथा आता पुस्तकरुपात जगासमोर आलीय. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘अनब्रेकेबल’ या मेरीच्या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं.
`माझा संघर्ष हा देशातील अनेक लोकांच्या विशेषत: महिलांच्या संघर्षाची कहाणी आहे. मी माझं आयुष्य आणि संघर्ष पुस्तराच्या रुपात मांडण्याचा विचार केला. माझं आत्मचरित्र वाचून लोकांना कळेल की, मी माझ्या स्वप्नांना गवसणी घालू शकते तर इतर लोकही ते करु शकतात,` असं मेरीनं म्हटलंय.
मेरी कोमच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन अमिताभ यांनी अनोख्या स्टाईलमध्ये केलं. यावेळी अमिताभ आणि मेरी कोममध्ये एक फ्रेण्डली बाऊट रंगली. बॉलिवूडच्या शहेनशाहला बॉक्सिंग तर आवडतंच शिवाय मेरी कोम तर आपल्यासाठी मोठी प्रेरणा असल्याचंही अमिताभ यांनी सांगितलं.
मणीपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचारादरम्यान मेरीच्या जीवाची झालेली तगमग मनाला चटका लावून जाते. मेरी आता काहीशा दुर्लक्षित असणाऱ्या या राज्याचा एक चेहरा बनली आहे आणि तिची प्रतिमा बॉक्सिंगपेक्षाही मोठी झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.