लाचखोर चिखलीकरच्या पत्नीचीही शरणागती

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंता सतिश चिखलीकर याची बायको स्वाती अँन्टी करप्शन ब्युरो समोर (एसीबी) शरण आलीय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 7, 2013, 04:12 PM IST

www.24taas.com, नाशिक
नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंता सतिश चिखलीकर याची बायको स्वाती अँन्टी करप्शन ब्युरो समोर (एसीबी) शरण आलीय. स्वातीच्या चौकशीतून सतीश चिखलीकरची आणखी काही बेनामी संपत्ती सापडण्याची शक्यता आहे.
ज्या दिवशी सतीशला लाच घेताना पकडण्यात आलं त्या दिवसापासूनच स्वाती चिखलीकर गायब होती. स्वाती सतीशनं गोळा केलेल्या बेनामी संपत्तीची विल्हेवाट लावत असल्याचा एसीबीला संशय आहे. अनेक बँकांमधील लॉकर तिच्या नावावर असल्याचा एसीबीचा संशय आहे. गायब असल्याच्या काळात स्वाती काही लॉकर्स ऑपरेट केल्याची माहितीही एसीबीला मिळालीय. सतीश जाळ्यात आल्यानंतरच्या काळात स्वातीनं बेनामी संपत्तीची विल्हेवाट लावली असावी, असा अंदाज आहे. एसीबी त्यादृष्टीने तपास करीत असून त्यांची हाती आणखी काही महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

स्वातीच्या शरणागतीनंतर एसीबीनं आता चिखलीकराच्या नातेवाईकांकडे मोर्चा वळवलाय. चिखलीकरनं ज्या नातेवाईकांच्या नावे बेनामी संपत्ती खरेदी केली, असे नातेवाईकही एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्यावरही याप्रकरणी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.