ओव्हरटेकच्या नादात एसटीची ट्रकला धडक, चार ठार

माळशेज घाटात दरीत एसटी कोसळून झालेल्या अपघाताला दोन दिवसही उलटले नाहीत तोच अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरजवळ आज पुन्हा एक एसटी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 5, 2014, 03:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अकोला
माळशेज घाटात दरीत एसटी कोसळून झालेल्या अपघाताला दोन दिवसही उलटले नाहीत तोच अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरजवळ आज पुन्हा एक एसटी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय.
या अपघातात चार जण ठार झालेत तर २४ जण जखमी झाल्याचं समजतंय. जखमींमधील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. ही एसटी बस बुलडाण्याकडे जात होती. त्याचवेळी अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकची आणि बसची मूर्तीजापूर शहराजवळ असणाऱ्या हेंडज फाट्याजवळ या जोरदार धडक झाली.
समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटीनं समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं बसमधील प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
दरम्यान, अपघातातील जखमींना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलंय. मृतांमध्ये बुलडाणा येथील वीर नितीन बेंडवाल या अकरा महिन्याच्या मुलाचा समावेश आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.