www.24taas.com, नाशिक
देशभरात जैन साधू संतांवर होणा-या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये संस्कृती रक्षण मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुजरात, उत्तर भारतासह सांगली जिल्ह्यातही जैन संतांवर हल्ला झाला. त्याचा निषेध करण्यासाठी श्री जैन सेवा संघानं नाशिकमधून मोर्चा काढला होता. त्यात एक ते दीड हजार जैन बांधव सहभागी झाले होते.
समाजाच्या उत्थानासाठी जैन साधू संत पायपीट करत एका प्रांतातून दुस-या प्रांतात विहार करत असतात. मात्र गेल्या काही दिवसात वाहनाच्या धडकेत जैन धर्मगुरूंच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. दोन वर्षात महामार्गावरच्या अपघातात देशभरात २१९ धर्मगुरूंचा अंत झालाय. एकापाठोपाठ घडणा-या या घटना अपघात नसून यामागे घातपात असल्याचा संशय जैन समाजकडून व्यक्त केला जातोय.
या घटनेची चौकशी करण्याबरोबर साधू संतांना सुरक्षा देण्याची मागणी मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली. मोर्चात महापौरांसह, मनसे आणि काँग्रेसचे आमदार सहभागी झाले होते. सीबीएस चौकात आंदोलकांनी घोषणाबाजी केल्यानं चारही बाजूची वाहतूक खोळंबली होती.