www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
पर्यावरणाच्या असमतोलाला कारणीभूत ठरलेल्या वृक्षतोडीची गंभीर दखल मुंबई उच्च नायालयाने घेतली असून महामार्ग प्राधिकरण आणि नाशिक महापालिकेला चांगलच फटकारलय.
या पुढे नाशिक महापलिका हद्दीतील एकाही झाडाची तोडणीच काय पण छाटणीही आपल्या परवानगीशिवाय करून नये असे सज्जड निर्देश न्यायालयानं दोघांना दिलेत.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तब्बल १५ हजार झाडांची कत्तल करण्यात आली. त्या विरोधात नाशिक नागरिक कृती समिती दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनवणी दरम्यान उच्च न्यायलयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कारभारावर ताशेरे ओढलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.