www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्ये नव्यानं बांधकाम झालेल्या उड्डाणपूलाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी मराठा संघटनांनी आंदोलन केलं. मराठा संघटनांनी आज आंदोलन करुन छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असा नामकरण फलक झळकावला.
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कोणीही विरोध करणार नाही. उड्डाणपूलाला महाराजांचे नाव देण्याबाबत काहीही विरोध असणार नाही मात्र असा प्रकार होता कामा नये.’ ‘राज साहेबांची स्पष्ट भूमिका आहे कुठल्याही गोष्टीचा संदर्भ जोडायचं आणि नाव द्यायचं... याला काही अर्थ नाही. त्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्यानतंर नावं द्यावं.’ अशी भूमिका मनसे आमदार वसंत गिते यांनी घेतली.
या पुलाचा एक टप्पा अजूनही वाहतुकीसाठी खुला झालेवला नाही.त्याआधीच नामकरणाचा मुद्दा तापण्यास सुरुवात झालीय. प्रशासनाकडं वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष करण्यात आल्यानं हे आंदोलन केल्याचा दावा मराठा संघटनांनी केलाय. तसंच भविष्यात सुचविण्यात येणा-या प्रत्येक नावाला मराठा महासंघटनेचा विरोध असल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलंय.