`अभाविप`ची तोडफोड, उधळली सिनेट बैठक

मुंबईत विद्यापीठांच्या परीक्षांचा घोळ सुरु असताना नागपुरमध्येही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गोंधळ घातला. आंदोलकांनी विद्यापीठाच्या परिसरातच शर्ट काढून विद्यापीठाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी आणि तोडफोड केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 30, 2013, 01:26 PM IST

www.24taas.com, नागपूर
मुंबईत विद्यापीठांच्या परीक्षांचा घोळ सुरु असताना नागपुरमध्येही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गोंधळ घातला. आंदोलकांनी विद्यापीठाच्या परिसरातच शर्ट काढून विद्यापीठाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी आणि तोडफोड केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सिनेटची बैठक उधळून लावली. विद्यापीठात आज सिनेटची बैठक होणार होती त्यात विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार होता. पण, अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गोंधळ घालत बैठक सभागृहात तोडफोड केली आणि खुर्च्यांची फेकाफेक केली.

प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे नागपूर विद्यापीठाच्या ४८ अभ्यासक्रमाच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अभाविपचे कार्यकर्ते नाराज होते. पुढे ढकलेल्या परीक्षा वेळेवर सुरु कराव्या अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी होती. हीच मागणी करत कार्यकर्त्यांनी शर्ट काढून आंदोलन केलं. या प्रकरणी १३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.