नाशिकमध्ये सराईत गुन्हेगारावर गोळीबार

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भीम पगारेवर गोळीबार झालाय. यांत त्याचा मृत्यू झालाय. नाशिकच्या राजीवनगर परिसरात ही घटना घडलीय.

Updated: May 10, 2014, 09:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भीम पगारेवर गोळीबार झालाय. यांत त्याचा मृत्यू झालाय.नाशिकच्या राजीवनगर परिसरात ही घटना घडलीय.
रात्री दुचाकीवरुन जाताना चौघांनी त्याचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्याच्यावर एक गोळी फायर केली.
स्वतःचा बचाव करण्यासाठी पगारे जय गणराज अपार्टमेंटमध्ये शिरला. मात्र तिथं त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि त्य़ाचा मृत्यू झाला.
भीमराव पगारेवर आधी खून, गुंडगिरी आणि दंगलीचे आरोप आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.