विकास भदाणे, www.24taas.com, जळगाव
पावसाअभावी फुलांचं उत्पादन घटल्यानं आवक कमी झाली पर्यायी यंदा फुलांना चांगला दर मिळतोय. दसरा आणि दिवाळीतही शेतक-यांना चांगले दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून दुष्काळात शेतक-यांना झेंडुनं चांगली साथ दिलीय. जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांना झेंडुला ३० ते ४० रुपये दर मिळाल्याने इथला शेतक-यांचे प्रयत्न यशस्वी झालेत.
गेल्या महिन्यात झेंडुच्या फुलांच्या मागणीत घट झाली होती मात्र दुर्गोत्सव सुरु झाल्यानं झेंडुच्या मागणीत आता वाढ झालीय. दसरा आणि त्यानंतर येणारी दिवाळीमुळे शेतक-यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा हि व्यक्त केली जाते. पाउस कमी असला तरी शेतक-यांना यंदा मोठा कष्टानं झेंडुचं चांगल उत्पादन घेतलंय. जळगांवपासून १० किलोमिटर अंतरावर असलेलं शिरसोली गावातील शेतक-यांनी तर पुण्याहून कोलकाता जातीचा वाण आणून लागवड केलीय. हि लागवड यशस्वी झाली असून शेतक-यांना चांगलं उत्पादन मिळालंय.
शिरसोली गाव हे झेंडु,गुलाब,मोगरा,गुलछडी यासह असंख्य जातीच्या फुलांचं उत्पादन घेणार मोठं केंद्र आहे. यंदा इथल्या शेतक-यांना झेंडुला ३० ते ४० रुपये किलोला एवढा दर मिळाला आहे.
शेतक-यांनी झेंडुची विक्री करतांना शक्यतो एकाच बाजारपेठेत गर्दी करु नये. कारण आवक वाढल्याचं निमित्त करुन व्यापारी भाव पाडतात. त्यामुळे येत्या दसरा दिवाळीला शेतक-यांनी शक्य असल्यास स्वत: विक्री करावी किंवा जास्त माल असेल तर दुरच्या बाजारपेठेत विक्री करावी यामुळे शेतक-यांना नक्कीच झेंडुला चांगला दर मिळण्यास मदत होईल.